जळगाव (राहुल डी गाढे ) हवामानावर आधारीत फळपिक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या खात्यामध्ये शुक्रवारी रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. हवामानावर आधारीत फळपिक विमा ज्या शेतकर्यांनी काढला आहे. याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आज पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यात केळी उत्पादकांना तब्बल ३३५ कोटी रूपये इतकी विम्याची रक्कम मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. तर, तालुका पातळीवर शेतकर्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी समित्या नेमण्यात याव्यात असे निर्देश देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिले.[ads id="ads1"]
हवामानावर आधारीत फळपिक विमा ज्या शेतकर्यांनी काढला आहे. याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, विमा कंपनीचे प्रतिनिधी कुंदन बारी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याला ३३५ कोटींची नुकसानभरपाईची रक्कम जाहीर झाली असून, ती रक्कम शुक्रवारपासून शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.[ads id="ads2"]
याप्रसंगी खरीप पीक विमा योजनेत अनेक शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम पडण्यास अडचणी येत असल्याने, याबाबत पीक विमा कंपनीसोबत चर्चा करून शेतकर्यांच्या अडचणी सोडविण्याच्या सूचना गुलाबराव पाटील यांनी दिल्या. यासह हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतर्ंगत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्यांना नुकसानभरपाईपोटी ३३५ कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली असून, इतर जिल्ह्यांमधील शेतकर्यांनी ती रक्कम मिळाली आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांना अद्याप का मिळाली नाही ? यावर देखील गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत.
त्यानंतर पीक विमा कंपनीच्या प्रतिनीधींसोबत चर्चा केल्यानंतर, ही रक्कम शुक्रवारपर्यंत शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना व विशेष करून नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम साठी जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार शेतकर्यांनी सहभाग नोंदविला असून शेतकरी हप्ता पोटी रक्कम ३५ कोटी २३ लाखांची रक्कम भरण्यात आल्याची माहिती यावेळी कृषी विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांनी पीक विमा योजनेबाबत शेतकर्यांना नुकसान भरपाई बाबत येणार्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार निवारण केंद्र सुरु करण्याच्या सुचना यावेळी दिल्या.


