धरणगाव प्रतिनिधी - पी डी पाटील सर
धरणगांव - येथील समस्त माळी समाज पंच मंडळ लहान माळी वाडा यांच्यावतीने सालाबादा प्रमाणे ह्यावर्षी ही कै.दादासो.किसन गबा महाजन यांच्या स्मरणार्थ भटूलाल किसन महाजन व राजेंद्र किसन महाजन यांच्या वतीने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. [ads id="ads1"]
दि. १ सप्टेंबर गुरूवार पासुन तर ८ सप्टेंबर गुरूवार पर्यंत होत असलेल्या ह्या किर्तन व ज्ञानेश्वरी पारायण चा कार्यक्रमात महाराष्ट्र सह जिल्हा परिसरातील नामांकीत किर्तनकार सहभागी होणार आहेत तरी शहर व परिसरातील भाविकांनी किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पंच मंडळाचा वतीने करण्यात आले आहे. [ads id="ads2"]
दैनंदिन कार्यक्रम खालील प्रमाणे सकाळी 4.00 ते 5.30 काकडा आरती सकाळी 8.00 ते 9.00 प्रार्थना व ज्ञानेश्वरी प्रवचन संध्याकाळी 5.00 ते 6.00 हरिपाठ व रात्री 8.00 ते 11.00 कीर्तनाच्या कार्यक्रम पुढील प्रमाणे गुरुवार 1 रोजी ह भ प मुकेश महाराज,( आंबे पिंपरीकर) शुक्रवार 2 ह भ प बापू महाराज,(मनमाड) शनिवार 3 ह भ प कुमारी मुक्ताबाई महाराज,( आळंदीकर) रविवार 4 ह भ प परशुराम महाराज,( पातोंडा चाळीसगाव) सोमवार 5 ह भ प ज्ञानेश्वर महाराज (जळकेकर),मंगळवार 6 हभप रामकृष्ण महाराज, (लामकाणीकर ) बुधवार 7 ह भ प सुनीताताई महाराज,( पाचोरा ) गुरुवार 8 हभप जिवराम महाराज, (कापडणेकर )यांचे काल्याचे किर्तन होईल, तरी पंचक्रोशितील हजारो भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त माळी समाज अध्यक्ष व पंच मंडळ लहान माळी वाडा धरणगाव यांनी केले आहे.


