यावल (सुरेश पाटील) जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये नोकरी लावून देण्याच्या कारणावरून यावल तालुक्यात वीस ते पंचवीस तरुणांकडून प्रत्येकी 1 ते दीड लाख रुपये खंडणी घेऊन सुशिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याची यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागात आणि पंचायत समिती कार्यक्षेत्रात ग्रामीण भागात खमंग चर्चा सुरू असल्याने चोपडा विधानसभेच्या आमदार सौ.लताताई सोनवणे आणि रावेर विधानसभा आमदार शिरीषदादा चौधरी यांना आपल्या मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक हे एक मोठे आव्हान असल्याची यावल,रावेर,चोपडा तालुक्यात बोलले जात आहे.[ads id="ads1"]
यावल तालुक्याचा पूर्व भाग हा रावेर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या कार्यक्षेत्रात तसेच यावल तालुक्याचा पश्चिम भाग हा चोपडा विधानसभेच्या आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या कार्यक्षेत्रात येतो.दोघेही आमदार राजकीय पक्षाच्या दृष्टीने आणि पूर्व पश्चिम दिशेप्रमाणे विरुद्ध टोकावर आहेत दोघेही आमदार सक्षम असल्यावर सुद्धा यांच्या मतदारसंघातील एका शासकीय अधिकाऱ्याने आपल्या मतदार संघातील 20 ते 25 सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गाठून जिल्हा परिषद जळगाव आरोग्य विभागात नोकरी लावून देण्यासाठी प्रत्येकी एक ते दीड लाख रुपये घेऊन तरुणांना पद्धतशीरपणे चुना लावला बेरोजगार तरुणांना आश्वासनावर आश्वासने दिली जात असून आरोग्य विभागात नोकरी लागत नसल्याने मात्र आता ते सर्व तरुण हवालदील झाले असून आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडपणे बोलत आहे.[ads id="ads2"]
याकडे रावेर चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी आपले सर्व राजकीय वर्चस्व पणाला लावून या अधिकाऱ्याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांची लाखो रुपयात फसवणूक केली त्याची चौकशी करून कार्यवाही करून प्रकरण चव्हाट्यावर जनतेच्या माहितीसाठी आणावे असे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.तरुणांची फसवणूक करणारा शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कोण? आणि त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा आणि प्रभाव तरुणांवर कोणत्या पद्धतीने टाकला याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.


