यावल प्रतिनिधी(फिरोज तडवी)
यावल तालुक्यातील आमोदा शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने विजांचा लखलखाट होऊन अस्मोदा शिवारात शेतात काम करीत असतांना अंगावर वीज कोसळल्याने वृध्द शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना दुपारी घडली आहे. याप्रकरण फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
ज्ञानदेव धनु चौधरी (वय ६०) रा. आमोदा ता. यावल जि.जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की,आमोदा येथील रहिवासी ज्ञानदेव धनु चौधरी हे आमोदा शिवारातील आपल्या शेतात बुधवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास काम करत होते. दरम्यान अचानक ढगांचा व विजांचा कडकडाट होऊ लागला. त्यानंतर त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. [ads id="ads2"]
त्यांना तत्काळ फैजपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांची वैद्यकिय तपासणी केली असता त्यांचा मृत्यू घोषीत करण्यात आला या शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.
पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सानप यांनी पंचनामा केला. शेतकऱ्याला व कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिसरातून होत आहे. फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


