यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी)
मुंबई येथे पावसाळी अधिवेशना दरम्यान धनगर समाजाच्या विविध प्रश्नासाठी व मेंढपाळाच्या विविध हक्कासाठी धनगर समाजाचे शिष्टमंडळ गेले असताना वैजनाथ पावडे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री विधानपरिषद सदस्य महादेव जानकर यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.[ads id="ads1"]
मेंढपाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी आपण विधिमंडळात प्रश्न मांडावा नाहीतर आम्ही मेंढपाळ बांधव कोणत्याही मंत्र्याला येत्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात प्रवेश करू देणार नाही हे सुद्धा वैजनाथ पावडे यांनी सांगितले.[ads id="ads2"]
यावेळी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे ज्ञानेश्वर जोशी ओमकेश वैद्य विजू महाणर , पवन थोटे प्रशांत गोडसे विजय महानर दादाराव महानर पंकज दाढे रमेश महानर वामन महानर धोंडबाजी कोळपे अशोक वगरे विलास महणर बद्री लांबाडे इत्यादी उपस्थित होते


