मुंबई (राहुल डी गाढे) विद्युत सहाय्यक (Mahavitaran Vidyut Sahayak) पदाकरिता महाराष्ट्र राज्य सरकारकडून प्रसिद्ध झालेल्या २०१९ मधील जाहिरातीस अनुसरून निवड झालेल्या उमेदवारांना सर्वच्या सर्व पाच हजार जागांवर तत्काळ नियुक्ती करण्याचे आदेश महारष्ट्र सरकारने महावितरणला(Mahavitran) द्यावेत, या मागणीसाठी राज्यातील सुमारे 600 ते ७०० उमेदवार मुंबई येथील आझाद मैदानात धरणे आंदोलन करीत आहेत.[ads id="ads1"]
जुलै २०१९ मध्ये महावितरण (Mahavitaran)कंपनीने विद्युत सहाय्यक (Vidyut Sahayak) पदाकरिता जाहिरात देण्यात आली होती. चार हजार ५३४ उमेदवारांपैकी अवघ्या १,७०० उमेदवारांना पात्र ठरवून त्यांची विविध प्रादेशिक विभागाअंतर्गत विद्युत सहाय्यक पदावर नियुक्ती करण्यात आली.[ads id="ads2"]
उरलेल्या २,२६९ उमेदवारांना प्रतीक्षा यादीवर ठेवल्याने आजही त्यांना नोकरीत सामावून घेतले जात नसल्याने ते संतप्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या विषयाला गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला तत्काळ नोकरीवर रुजू करून घ्यावे, अशी मागणी उपोषण कर्त्यानी केली आहे.



