मालकी व स्वामील प्रकरणात इंटरेस्ट आणि कमाई असल्याने वृक्षतोड कडे दुर्लक्ष,बनावट दस्तऐवजाने दाखवला जातो जंगलात मुक्काम
यावल (सुरेश पाटील) शासकीय सेवेत कर्तव्य निभावत असताना वृक्षतोड व कामकाजात हलगर्जी पणा केल्याच्या कारणावरून यावल वन विभागातील वनपाल, वनमजूर व वनरक्षक असे तीन वन कर्मचारी गेल्या दोन दिवसापूर्वी निलंबित झाल्याची संपूर्ण सातपुडा जंगलात चर्चा केली जात असून याबाबत संबंधित कर्मचारी व अधिकारी अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यास तयार नसल्याचे तसेच दुसऱ्या काही घटनांकडे नागरिकांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करीत असले तरी यावल वन विभागात तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर आता खरे जबाबदार आणि अकार्यक्षम काही अधिकारी,कर्मचारी निलंबित होण्याच्या मार्गावर असल्याने यावल वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]
संपूर्ण यावल वन विभागात सागवानी व इतर मौल्यवान वृक्षाची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे,जुन्या सागवानी लाकडाच्या पासेसवर आणि लिलावात घेतलेल्या सागवानी लाकडाच्या पासेसच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाची सागवानी वृक्ष तोड करून सर्रासपणे मोठ्या प्रमाणात सागवानी लाकडाची तस्करी खुल्या सर्वत्र सुरू आहे वनविभागाचे फॉरेस्ट नाके आहे किंवा नाही?आणि फॉरेस्टचे तपासणी नाके असताना सागवानी लाकडाची तस्करी होते कशी? तसेच ग्रामीण भागात ठराविक ठिकाणी काही राजकीय पक्षाचे पंटर आणि पुढारी यांचेच लाकडाचे अवैध व्यवसाय असल्याने अधिकारी,कर्मचारी यांच्या संगणमताने अवैध सागवानी लाकडाची तसेच इतर वन संपत्तीची अवैध वाहतूक व विक्रीतून दर महिन्याला कोट्यवधी रुपयाची उलाढाल होत आहे,तसेच काही किरकोळ सागवानी लाकूड विक्रेत्यांवर नाममात्र कारवाई केल्याचे सुद्धा बोलले जात असून याकडे संपूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.[ads id="ads2"]
काही अधिकारी आणि कर्मचारी मालकी व स्वामील प्रकरणातच जास्त "इंटरेस्ट" घेत असून त्यात त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होत आहे काही जबाबदार अधिकारी जंगलात ठरल्याप्रमाणे शासन नियमानुसार ठराविक दिवशी मुक्कामी राहतात का? किंवा जंगलात मुक्कामी राहण्याचे बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची व वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून वृक्षतोड करण्यासाठी व सातपुड्याची जागा सपाटीकरण करून शेती करण्यालायक सातपुड्याची जागा आदिवासींना उपलब्ध करून देण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करीत आहेत का?आणि अशा प्रकरणांमध्ये काही आदिवासी संघटनांच्या दबावाला बळी पडत आहेत का?अशा काही अकार्यक्षम अधिकाऱ्यांचे काही पुरावे,व्हिडिओ चित्रण,माहिती सामाजिक संस्थांचे व वन्यप्रेमी संघटनांचे पदाधिकारी व काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी संकलित केली असून वनरक्षक धुळे,प्रधान मुख्य वनरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य नागपूर,महाराष्ट्र राज्य महसूल व वनविभाग वनसचिव/सेक्रेटरी यांच्याकडे संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात पुराव्यासह पोचणार असल्याने आता यावल वन विभागातील काही मुख्य जबाबदार आणि अकार्यक्षम असलेले अधिकारी लवकरच निलंबित होणार असल्याचे संपूर्ण यावल वन विभागात बोलले जात आहे.
सागवानी लाटणे आणि अंजन लाकडापासून तयार केलेल्या बेलनची अवैध वाहतूक करताना वन विभागाने काल दि. 19 रोजी कारवाई केल्याची माहिती ठराविक वृत्तपत्रातूनच प्रसिद्ध झाल्याने वन विभागाचा हा माहिती दडपण्याचा प्रकार आहे का? आणि इतर महत्त्वाच्या घटनांकडे नागरिकांचे दुर्लक्ष कसे होईल असा प्रयत्न यावल वन विभागाकडून केला जात आहे, यावल पूर्व -पश्चिम वन विभागात पुष्कळ घटना घडतात परंतु त्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना वेळेवर मिळत नसल्याने तसेच यावल पूर्व- पश्चिम वन विभागात भरारी पथक आहे किंवा नाही त्यांची कारवाई काय?आणि ते काय कारवाई करतात ती माहिती प्रसिद्धी माध्यमांना ते का देऊ शकत नाही? याबाबत आणि वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत,बेलन,लाटणे सागवानी लाकडाची वाहतूक ही दररोज सुरू असताना कधी नाते कारवाई होते यातच कारवाईबाबत मोठा दाट संशय व्यक्त केला जात आहे.


.jpg)