जळगाव प्रतिनिधि-विनोद कोळी
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 19 आगस्ट ला प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्रात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय मिळाले पाहिजे म्हणून निवेदन देण्यात आले.यावेळी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष यांची उपस्थिती होती.त्या वेळी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.[ads id="ads1"]
निवेदना मध्ये दिव्यांग बांधवांचे, विधवा महिलांचे अनेक प्रश्न मांडण्यात आले.तसेच तालुका अध्यक्ष यांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.तसेच दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय लवकरच होणार असल्याचे संकेत दिव्यांग बांधव यांना बच्चू भाऊन कडून मिळाले आहे.[ads id="ads2"]
यावेळी उपस्थीत जिल्हा अध्यक्ष, बाळासाहेब पाटील,उपजिल्हा अध्यक्ष,शकील भाऊ.जिल्हा सल्लागार,राजमल वाघ.जिल्हा संघटक,राजेश खडके.दिव्यांग रावेर तालुका अध्यक्ष,विनोद कोळी.मुक्ताई अध्यक्ष,उत्तम जुम्बळे.चोपडा अध्यक्ष,भगवान वैदू,प्रहार रुग्णसेवक ,हरिष कुमावत.चाळीसगाव तालुका अध्यक्ष,स्वाती ताई.तसेच सर्व प्रहार तालुका अध्यक्ष त्यानिवेदन देतेवेेळीच्या ठिकाणी हजर होते.


