निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने बौद्ध समाजातील विधवा, घटस्फोटित महिलांच्या पुनर्विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.[ads id="ads1"]
रावेर येथील मुख्य कार्यालय येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या मुख्य कार्यकारिणी बैठक संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.[ads id="ads2"]
या बैठकीमध्ये बौद्ध समाजातील विधवा, घटस्फोटित महिलांची नोंदणी दिनांक ५ सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोंबर रोजी होणार असून वधू / वर परिचय मेळावा १६ ऑक्टोंबर रोजी तर मंगल परिणय पुनर्विवाह सोहळा २६ नोव्हेंबर २०१२ रोजी रावेर येथे संपन्न होणार आहे.नाव नोंदणी साठी ९३५६४६३२१५ यावर संपर्क करावा अशी माहिती निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बाविस्कर यांनी बोलताना दिली.


