ठाणे अंमलदार,नामदारी आणि पोलीस निरीक्षक न्यायाधीश ? यावल पो.स्टे.चा भोंगळ कारभार ; पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल (सुरेश पाटील) तत्कालीन यावल तहसीलदार आणि तत्कालीन उप- जिल्हाधिकारी राहुल मुंडके तसेच विद्यमान तहसीलदार महेश पवार यांच्या विरोधात यावल पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देण्यास गेलेल्या तक्रारदारास ठाणे अंमलदाराने दोन तास थांबवून मी ही तक्रार घेऊ शकत नाही पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिल्यावरच मी तक्रार घेईल अशी ठाणे अंमलदारांने निर्णय घेत दोन तासानंतर आलेले पोलीस निरीक्षक यांनी कोणा विरुद्ध तक्रार आहे.[ads id="ads1"] 

 याची खात्री करून तात्काळ न्यायाधीशाची भूमिका घेऊन मी ही तक्रार घेऊ शकत नाही,तुम्ही यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करा असा न्यायाधीशा प्रमाणे निर्णय घेऊन सल्ला दिला,पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदारास पूर्ण अधिकार असताना मात्र तक्रार घेण्यास टाळाटाळ करणे म्हणजे कायद्याची पायमल्ली करणे आहे. ठाणे अंमलदार आणि पोलीस निरीक्षक यावल यांनी तक्रार घेतली नाही म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे रीतसर तक्रार दिली असल्याने यावल पोलीस स्टेशन मधील अनेक भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर येणार आहेत.[ads id="ads2"] 

        याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल येथील सन 2008 मधील तत्कालीन तहसीलदार त्यानंतर भुसावळ तत्कालीन प्रांताधिकारी आणि तत्कालीन जळगाव उपजिल्हाधिकारी कार्यरत असणारे राहुल मुंडके हे यावल येथे यावल तहसीलदार म्हणून कार्यरत असताना यावल तालुक्यात शेती खरेदी केली आहे, शेती खरेदी करताना राहुल मुंडके हेच स्वतः पिढीजात शेतकरी नसताना तसेच शेती खरेदी करताना त्यांनी शेतकरी असल्याचा पुरावा दाखला, जोडलेला नसताना शेती खरेदी केली तसेच चौकशी दरम्यान यावल येथे शेती घेतल्यावर आठ महिन्यानंतर अमळनेर येथे घेतलेल्या शेतीचे पुरावे यावल तहसीलदार महेश पवार यांच्या दालनात सादर केले आणि हा नंतरचा पुरावा यावल तहसीलदार महेश पवार यांनी कर्तव्यात कसूर करीत,अधिकाराचा दुरुपयोग करीत,संगनमताने आठ महिन्यानंतर घेतलेल्या शेतीचे पुरावे ग्राह्य धरून प्रकरण निकाली काढले आहे असे चौकशी दरम्यान पुरावे उघडकीस आलेले आहेत यानुसार या दोघं अधिकाऱ्यांनी संगनमताने आपल्या पदाचा,कायद्याचा आणि अधिकाराचा दुरुपयोग करून शासनाची शुद्ध फसवणूक आणि दिशाभूल करून कर्तव्यात कसूर व शिस्तभंग केलेली आहे.

        तसेच दुसऱ्या एका प्रकरणात तत्कालीन दुय्यम निबंधक महेंद्रसिंग परदेशी यावल येथे कार्यरत असताना तत्कालीन यावल तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके हे यावल येथे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गैरहजर असताना सुद्धा परदेशी यांनी दस्त नंबर 166/2020 रोजी बेकायदेशीर नोंदणी केले आहे याबाबत याबाबतची तक्रार नोंदणी महानिरीक्षक पुणे यांच्याकडे करण्यात आली होती त्या तक्रारी नुसार जिल्हा मुद्रांक अधिकारी जळगाव दुय्यम सहनिबंधक वर्ग एक यांच्याकडून चौकशी अहवाल मागविण्यात आला त्यात सुद्धा दुय्यम निबंधक परदेशी यांच्यावर राहुल मुंडके यांनी आपल्या अधिकाऱ्याचा दबाव आणि दुरुपयोग कसा केला आणि बेकायदेशीर काम कसे करून घेतले आहे हे कायदेशीर आणि पुराव्यानिशी उघडकीस आलेले आहे.

      या कारणावरून यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान चे कलम 406,407,420,467,468,471, व 472 प्रमाणे फिर्याद दाखल करणे कामी अण्णा हजारे कृत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन जळगाव जिल्हा अध्यक्ष सुरेश जगन्नाथ पाटील हे स्वत: यावल पोस्टला फिर्याद देण्यास गेले असता ठाणे आमदार आणि पोलीस निरीक्षक यांनी संशयित आरोपितांची नावे बघून वरील प्रमाणे फिर्याद घेण्यास टाळाटाळ करून स्पष्ट नकार दिला.यामुळे पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे रीतसर तक्रार करण्यात आली आहे.

          भ्रष्टाचार गैरप्रकार व कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अधिकारी कशी साथ देतात हे वरील घटनेवरून लक्षात येते,

        दि.29 रोजी सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान ही घटना घडलेली असताना तत्कालीन तहसीलदार राहुल मुंडके यांच्या यावल येथील एका खास पंटरला या तक्रारी बद्दल यावल पोलीस स्टेशन मधून कोणीतरी खबऱ्याने माहिती दिली.आणि त्या पंटरने तात्काळ यावल तहसील गाठून तत्कालीन उपजिल्हाधिकारी असलेले मुंडके यांचे ओळखीचे असलेले नायब तहसीलदार संतोष पी.विनंते यांच्याशी संगनमत करून दिशाभूल करणारी खोटी तक्रार देऊन फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला याबाबत या दोघांविरुद्ध पुढील कार्यवाही सुद्धा केली जाणार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!