श्री.संत सेना महाराज पुण्यतिथी यावल येथे डॉ.कुंदन फेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न.

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल दि.24(सुरेश पाटील)

काल मंगळवार दि.23 रोजी म्हणा हरी हरी।अवघे सकळ नरनारी ॥१॥,येणें तुटेल बंधन। भाग निवारील शीण ॥२॥,प्रेमें घ्यारे मुखीं नाम। हरे सकळही श्रम ॥३॥,सेना म्हणे चित्तीं धरा। बळकट रखुमाईच्या वरा ॥ असा जयघोष करीत यावल येथे श्री. जिवा महाले नाभिक बहूउदेशिय संस्था यावल यांच्या वतीने वारकरी संप्रदयातील महान संत श्री.संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले.[ads id="ads1"] 

  सदर कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक वाचनालय गवत बाजार यावल येथे केले होते.या कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी डॉ.कुंदन फेगडे हे होते. डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.[ads id="ads2"] 

  तसेच अयोजकांच्या वतीने डॉ.कुंदन फेगडे यांचा सत्कार देखील करण्यात आला.श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त डॉ.कुंदन फेगाडे यांनी एकूण70 संत सेना महाराज यांची प्रतिमा नाभिक समाज बांधवांना सप्रेम भेट म्हणून दिल्या.या प्रसंगी डॉ. कुंदन सुधाकर फेगडे,माजी सैनिक श्री.गंगाधर पगारे,डॉ. युवराज चौधरी,विठ्ठल वारूळकर,संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी,उपाध्यक्ष सुपडू वारूळकर,जीवा महाले, रणजित ठकरे,दिलीप चौधरी,सुनील सनासे,रवी अमोडकर,सुपडू वारूळकर,राजेंद्र चौधरी,सुरेश चौधरी व संचालक मंडळ आणि यावल येथील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!