ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी अभियानाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे.बी. अंजने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. प्राचार्या हस्ते नविन मतदार नोंदणी फॉर्मचे वाटप करण्यात आले.[ads id="ads2"]
आपल्या उद्घाटन भाषणात मा. डॉ जे.बी. अंजने यांनी सशक्त लोकशाही साठी सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे या उपक्रमात ज्या विद्यार्थ्यांचे नांव मतदार यादीत नोंदणी केेलेली असेल अशा विद्यार्थ्यांना कडुन नवीन मतदार नोंदणी फॉर्म भरून घेतले. या उपक्रमासाठी नोडल अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर, डॉ विनोद रामटेके, डॉ सतिश वैष्णव, डॉ जयंत नेहेते, गोपाल पाटील विक्रम राठोड, सुलेमान तडवी तहसील कार्यालय रावेर यांनी मेहनत घेतली.


