आगामी सण,उत्सव एकोप्याने साजरे करा- पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांचे कुसुंबा बू येथे श्रीराम मंदिराच्या आवारात झालेल्या बैठकीत आवाहन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

आगामी सण,उत्सव एकोप्याने साजरे करा- पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांचे कुसुंबा बू येथे श्रीराम मंदिराच्या आवारात झालेल्या बैठकीत आवाहन

कुसुंबा ता.रावेर (हमीद  तडवी) रावेर तालुक्यातील कुसुंबा बू येथे श्रीराम मंदिरच्या आवारात रावेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी कुसुंबा येथील गावकऱ्यांना येणाऱ्या सण उत्सवात आनंदाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच कालचक्र प्रमाणे येणारे सण उत्सव येतीलच म्हणून सण उत्सवांचा देखील आदर करायला पाहिजे असेही पोलीस निरीक्षक नागरे यांचेकडून गावकऱ्यांना गावात शांतता अबाधित ठेऊन शांततेत पार पाडणे असेही आवाहन करण्यात आले.[ads id="ads1"] 

  त्याचबरोबर कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे,कायदा हा धर्म जात बघत नाही,तर वेळेवर कायदा दाखवून देतो,त्यामुळे कोणीही गावात कोणालाच घाबरायचे नाही,पोलीस हे कायदा तयार करत नाही तर कायद्याची अंमलबजावणी करत असतात म्हणून सर्वांनी मिळून मिसळून येणारे सण उत्सवात आनंदाने पार पाडायचे असे मार्गदर्शन करण्यात आले.[ads id="ads2"] 

  यावेळी यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठीत व्यक्तींनी देखील पोलीस निरीक्षक यांचे सोबत गावकऱ्यांना शांतता राखण्याबाबत  मार्गदर्शन केले,तसेच सामाजिक कार्यकर्ता नारायण घोडके,प्रदीप सपकाळे,आणि गावातील काही सुशिक्षित  पदाधिकारी यांनी मार्गदर्शन देण्यास सहभाग घेतला,यावेळी रावेर पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांचे पोलीस कर्मचारी आणि कुसुंबा बू,कुसुंबा खुर्द या दोन्ही गावातील ग्रामपंचायतचे निवडून आलेले नवनिर्वाचित पदाधिकारी ,असंख्य गावकरी देखील उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!