ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
फोटो ग्राफिच्या विज्ञानाने संपुर्ण मानवी इतिहासात महत्वाची भुमिका बजावली आहे जगभरात हा दिवस साजरा केला जातो . एक लोकप्रिय म्हण आहे की जी सर्वांनी अनेकदा ऐकली आहे ती म्हणजे एक फोटो हजार शब्दा प्रमाणे असते ही म्हण जागतिक फोटोग्राफी दिना मागील मुळ कल्पना चागल्या प्रकारे समजुन सांगु शकते हा दिवस दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो फोटो ग्राफी उत्साही जगभरातुन एकत्र येऊन फोटो काढण्याची कला साजरी करतात.[ads id="ads1"]
फोटोग्राफिच्या विज्ञानाने संपुर्ण मानवी इतिहासात महत्वाची भुमिका बजावली आहे आज आपल्याकडे ऐतिहासिक क्षणांच्या नोंदी आहेत कारण ते छाया चित्रामध्ये टिपले गेले आहेत आणि ते कायमचे पाहीले जाऊ शकतात फोटोग्राफी अभिव्यक्ती भावना कल्पना आणी क्षंण ताबडतोड कॅप्चर करू शकते आणि भावी पिढीसाठी साठवुन ठेवता येऊ शकते .[ads id="ads2"]
सविस्तर वृत्त असे की आज छायाचित्र दिना निमित्त रावेर तालुक्यातील सर्व फोटो ग्राफर यांनी वाघाडी फाटा येथे प्रितिकेश दादा मंगल कार्यालय येथे जागतिक छायाचित्र दिना निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष निभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश धुमाळ होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की जागतिक छायाचित्रण दिवस कोणी सुरु केला फ्रान्स मध्ये 1837मध्ये जोसेफ निस फोर निपसे आणि लुईस डॅएगुरे नावाच्या दोन फ्रेंच लोकानी डॅएगुरो टाईप चा शोध लावुन प्रथमच छाया चित्रण प्रक्रिया विकसित केली म्हणून त्या दिवसा पासुन 19/ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिवस साजरा करण्यात येतो असे त्यांनी जागतिक छायाचित्र दिनाचे महत्व सांगितले पत्रकार गुणवंत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला परिसरातील छायाचित्रकार उपस्थित होते कांतिलाल गाढे सुनिल महाजन सुरेश महाजन प्रंशात गाढे एस कुमार आकाश भालेराव . सदाशिव सोनवणे अजय तायडे ज्ञानेश्वर कोळी कार्तिक वाघ हरी शळके डी.डी वाणी गुणवत पाटील तसेच परिसरातील पत्रकार विजय अवसरमल रवि महाजन विनायक जहुरे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


