स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत राष्ट्रीय तिरंगा ध्यज वाटपास सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत राष्ट्रीय तिरंगा ध्यज वाटपास सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद

यावल (सुरेश पाटील) मंगळवार दि.9ऑगस्ट 2022 रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्याने यावल येथील जनसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत राष्ट्रीय ध्यज तिरंगा वाटप करण्यात शुभारंभ करण्यात आला.[ads id="ads2"] 

  या कार्यक्रमास सर्व स्तरातून उस्फूर्तपणे उत्तम प्रतिसाद मिळाला या वेळी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा भाजपाचे पदाधिकारी हिरालाल भाऊ चौधरी यांच्या हस्ते ध्यज वितरण करून हर घर तिरंगा अभियानास भारतीय जनता पार्टी कार्यालया पासून संपूर्ण यावल शहरात शुभारंभ करण्यात आला.[ads id="ads1"] 

      स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाला उदंड प्रतिसाद मिळतोय या अभियानात यावल तालुका तीळभर सुद्धा मागे राहणार नाही.यासाठी डॉ.कुंदन फेगडे यांनी मोफत राष्ट्रीय ध्यज तिरंगा वाटप अभियान सुरू केले आहे.

हेही वाच : - भरधाव ॲपे रीक्षा नाल्यात उलटल्याने एक ठार तर दुसरा गंभीर जखमी ; खिरोदा-पाल रस्त्यावरची घटना 

        याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य, हर्षल यावल पंचायत समिती उपसभापती दिपक आण्णा पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,तालुका सरचिटणीस उजैनसिंग तालुका सरचिटणीस विलास चौधरी,डॉ.कुंदन फेगडे, भाजयुमो जिल्हा ग्रामीण सरचिटणीस राकेश फेगडे, ओ.बी.सी.सेल जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे,अतुल भालेराव,यावल शहर अध्यक्ष डॉ. निलेश गडे,उदय बाविस्कर, सलीम तडवी,भूषण फेगडे,युवा मोर्चा यावल शहर अध्यक्ष रितेश बारी,स्नेहल फिरके,यावल शहर सरचिटणीस परिष नाईक.मनोज बारी आदींची उपस्थिती होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!