ऐनपूर - येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन कार्यक्रमाचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर येथे विद्यार्थी विकास विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग व समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, अण्णासाहेब जी डी बेंडाळे कला व विज्ञान महाविद्यालय जळगाव यांनी १८५७ पासून ते १९४२ पर्यंतच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची माहिती दिली. [ads id="ads1"] 

  भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना स्वातंत्र्य मिळावं त्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळावं जातिभेद नष्ट व्हावा याकरिता विविध थोर नेत्यांनी क्रांती केली. तसेच आदिवासी हे भारतातील मूलनिवासी आहेत व ते जल, जमीन आणि निसर्ग यांच्याशी एकरूप झालेले आहेत असे त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी केला. [ads id="ads2"] 

  बिरसा मुंडा यांनी आदिवासी लोकांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी क्रांती केली असे त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा.डॉ. विनोद रामटेके, प्रा. एस. पी. उमरीवाड प्रा.डॉ. डी. बी. पाटील प्रा.डॉ. जे.पी. नेहेते, प्रा. प्रदीप तायडे प्रा. अक्षय महाजन प्रा. डॉ. जे.पी. नेहेते, प्रा. आर व्ही. भोळे, डॉ.पी. आर. गवळी प्रा.एम के. सोनवणे, प्रा. एच.एम. बाविस्कर, व प्रा. व्ही एच. पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला १२५ विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार समान संधी केंद्राचे समन्वयक प्रा. एस पी उमरीवाड यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!