सावद्यात महावितरणाच्या धडक कारवाईत विविध कलमान्वये ४१ वीज चोरांविरुद्ध दंडात्मक कारवाई

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 सावद्यात महावितरणाच्या धडक कारवाईत विविध कलमान्वये ४१ वीज चोरांविरुद्ध दंडात्मक कारवाई


सावदा शहर (Savada City) व ग्रामीण भागात  (Rural Area) मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध सावदा उपविभागाने धडक कारवाई सुरू केली आहे.गेल्या आठवड्याभरात अशा ३० ग्राहकांची वीज जोडणी कापून मीटर जप्त करण्यात आले आहे. तसेच विविध कलमान्वये ४१ वीज चोरांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईने वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.[ads id="ads1"] 

महावितरणाच्या (Mahavitaran) वतीने कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्या आदेशानुसार व उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांचे मार्गदर्शनाखाली पथक स्थापन करून ज्या ज्या भागात विजेची हानी होत आहे अशा ठिकाणी वीज चोरांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे.[ads id="ads2"] 

या मोहिमेत ५० युनिट पेक्षा कमी वापर असलेले एकूण २३२ ग्राहकांच्या मिटरची कसून तपासणी करण्यात आली असून फेरफार असलेले सावदा शहर ०५, सिंगनूर १०, वाघोदा बुद्रुक ०६, चिनावल ०६, निंभोरा ०४, खिरोदा ०४, गाते ०२, कोचुर ०३, बलवाडी ०१ असे एकूण ३० मीटर जप्त करण्यात आले.

हेही वाचा :- विहीरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ ; जळगाव जिल्ह्यातली घटना 

हेही वाचा :- मधमाशी पालन व्यवसायाकरिता मिळणार ५० टक्के निधी; जाणून घ्या नेमकी योजना काय?

व सदरील ग्राहकांची वीज जोडणी कापण्यात आली आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व सर्व प्रकारच्या वर्गवारीतील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वीज चोरी करू नये; अन्यथा संबंधितांवर वीज कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आवाहन उप कार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!