रावेर प्रतिनिंधी राजेंद्र अटकाळे
रावेर - येथील पत्रकार कृष्णा पाटील यांना मुंबई येथील सेलेबस अँड गॉसिप या सामाजिक संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण १५ अगष्ट रोजी अंबरनाथ (मुंबई) येथे आयोजीत कार्यक्रमात करण्यात येणार आहे.[ads id="ads1"]
गेल्या तीस वर्षापासून पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. जळगाव जिल्ह्यातून या पुरस्कारासाठी निवड झालेले ते एकमेव पुरस्कारार्थी आहेत. [ads id="ads2"]
रावेर पंचायत समितीतील शौचालय अनुदान वितरणाचा घोटाळा त्यांनी नुकताच उघडकीस आणला असून तो जिल्हाभर गाजत आहे. रोखठोक व निर्भिड पत्रकारिता हे त्यांचे पत्रकारितेचे वैशिष्ट्य आहे .समाजावर होणाऱ्या अन्यायाला लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडतानाच भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध त्यांनी प्रहार केला आहे.


