विद्यार्थिनीच इंटरव्यूवर, विद्यार्थिनीच रिपोर्टर
रावेर : येथील सौ कमलाबाई अग्रवाल गर्ल्स हायस्कूल व मुलींचे कनिष्ठ महाविद्यालय, रावेर येथे नुकतेच इ दहावीच्या इंग्रजी विषय पाठ्यपुस्तकातील घटकाचे कृतीयुक्त अध्ययन अध्यापनचा उपक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थिनी वरती विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. कार्यक्रमाध्यक्षा म्हणून प्राचार्य जयश्री कुलकर्णी पुराणिक होत्या.[ads id="ads1"]
शतकाकडे वाटचाल करणाऱ्या रावेर शिक्षण संवर्धक संघ रावेर संचलित सौ कमलाबाई एस अग्रवाल गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सातत्याने नवोपक्रम राबविले जात असतात. इंग्रजी विषयाची विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती असते आणि याचसाठी इंग्रजी विषयातील अध्यापनाला असलेला मुद्दा 'इंटरव्यू ऑफ सक्सेसफुल टीनेजर' या मुद्द्याला कृतीयुक्त शिकविण्यात आले. यातून विद्यार्थिनींना यशस्वी जीवनाचा मूलमंत्र देण्यात आले. [ads id="ads2"]
प्रसंगी इयत्ता दहावीतील नव्वदीपार श्रुतिका महाजन (९७.८०) व नंदिनी कराड (९७.४०) या विद्यार्थिनींची मुलाखत संपन्न झाली. यात विद्यार्थिनीच रिपोर्टर व इंटरव्यूवर झाल्या. प्रत्यक्ष स्थळावर जाऊन वृत्तांकन करणे, मुलाखत घेणे, मुलाखतीचा सारांश समजून घेणे, प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, ब्रेक्स मध्ये शाळेच्या ऐतिहासिक वाटचालीची माहिती देऊन व रोचक तथ्य सांगितली. तसेच विद्यार्थिनी भावी काळात आपल्या करिअरला महत्त्व देऊन आवडीनुसार कशा पद्धतीने निवड करावी याची देखील माहिती देण्यात आली.
हेही वाचा :- रावेर तालुक्यातील वाघोडा ते रावेर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या रेल्वे गाडीखाली पडल्याने एका इसमाचा चिरडून मृत्यू
हेही वाचा :- अंगावर वीज कोसळल्याने यावल तालुक्यातील आमोदा शिवारात वृध्द शेतकरी ठार
हेही वाचा :- रावेर येथील पत्रकार कृष्णा पाटील यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर
संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन, सहभागींचे मत विद्यार्थ्यांनी अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत इंग्रजीतून झाले. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्तापूर्ण चूणूक दिसून आली. या कार्यक्रमाची संकल्पना उपक्रमशील शिक्षक विशाल राठोड यांची तर मार्गदर्शन इंग्रजी विषय शिक्षक प्रतिभा कुलकर्णी, यु बी तायडे, प्रा शरद चौधरी यांनी केले. यशस्वीतेसाठी एम पी पाचपोहे, तुषार गडे, डी आर उपाध्ये व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


