रावेर तालुक्यातील वाघोडा ते रावेर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या रेल्वे गाडीखाली पडल्याने एका इसमाचा चिरडून मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर (Raver) तालुक्यातील वाघोडा ते रावेर रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या रेल्वे गाडीखाली पडल्याने एका इसमाचा चिरडून मृत्यू
 रावेर तालुक्यातील वाघोडा ते रावेर (Waghod To Raver)रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या रेल्वे गाडीखाली पडल्याने एका इसमाचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.[ads id="ads1"] 

वाघोडा रेल्वे स्थानक (Waghod Railway Station) अधीक्षक राजेशकुमार यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनास्थळी रावेरचे पोलीस (Raver Police Station API) उपनिरीक्षक मनोहर जाधव, पो ना नितीन डांबरे यांच्यासह आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. [ads id="ads2"] 

  सदर इसमाची ओळख पटवण्यासारखी कोणतीही परिस्थिती वा पुरावा आढळून आला नाही. रावेर ग्रामीण रुग्णालयाचे (Raver Rural Hospital) वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश राणे यांनी मृतदेहाचे घटनास्थळीचं शवविच्छेदन केले. 

हेही वाचा :- अंगावर वीज कोसळल्याने यावल तालुक्यातील आमोदा शिवारात वृध्द शेतकरी ठार 

हेही वाचा :- रावेर येथील पत्रकार कृष्णा पाटील यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर

सदर इसमाची अद्याप ओळख पटू शकली नसून, त्याने आत्महत्या केली का? अन्य काही कारण असेल? याचा तपास घेणे सुरु असल्याचे पोलिस सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!