शालेय पोषण आहार ऑडिट निर्णयास शिक्षक शिक्षकेतर महासंघाचा विरोध

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 यावल दि.3(सुरेश पाटील) शाळांमधील शालेय पोषण आहाराचे गेल्या पाच वर्षाचे ऑडिट करण्याचे निर्दश शासनाने दिले आहे मात्र या कामास खाजगी व जिल्हा परिषद शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे, त्यानुसार महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर महासंघ शाखा यावल यांच्यातर्फे सुद्धा विरोध नोंदविण्यात आला.[ads id="ads1"] 

        महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक,शिक्षकेतर महासंघ यावल शाखा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शाळांमधील शालेय पोषण आहाराचे गेल्या पाच वर्षाच्या ऑडिट करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे,मात्र या कामास खाजगी व जिल्हा परिषद शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे या कामामुळे अध्यापनाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे,यामुळे या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाने केली आहे.[ads id="ads2"] 

         कोरोना नंतर शाळा नियमित सुरू झाल्या त्यासोबतच निपुण चाचणी,शाळाबाह्य सर्वेक्षण,सेतू अभ्यास अशी अनेक शैक्षणिक कार्य सुरू आहे या कामाकडेच अधिक लक्ष द्यावे लागत असल्यामुळे ऑडिटचे काम थांबवून या निर्णयाला स्थगिती द्यावी या मागणीचे निवेदन यावल गटशिक्षण अधिकारी शेख नईम यांना देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष आशिष बोरोले,उपाध्यक्ष पुरुषोत्तम साठे,सचिव हेमचंद खाचणे,तालुका सदस्य धनंजय काकडे,शकील तडवी,जिल्हा कार्यकारणी सदस्य सलीम तडवी सर उपस्थित होते.शिक्षकांनी कामाचा ताण हलका केल्यास त्यांना अध्यापनावर अधिक लक्ष देता येईल त्यामुळे मागणीची दखल घ्यावी अशी अपेक्षा महासंघाच्या वतीने आशिष बोरोले यांनी व्यक्त केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!