रावेर तालुक्यातील मौजे रसलपुर येथिल आदिवासी आश्रम शाळेत दि . ०१/०८/२०२२ रोजी रुपेश बारेला याचा दुर्दैवी मृत्यू झालेला असून संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे . रुपेश बारेला याचा मृत्यू शालीय प्रशासनाच्या दुर्लक्ष व हलगर्जी पणा मुळे झालेल्या आहे तरी रुपेश बारेला याच्या मृत्युच्या संदर्भात चौकशी करून शालीय प्रशासनावर कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन रावेर तहसील ला देण्यात आले.[ads id="ads2"]
शालेय प्रशासनावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास दि .१५/०८/२०२२ रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने रावेर तहसिलदार कार्यालया समोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल कृपया यांची नोंद घ्यावी असे निवेदन रावेर तहसील ला सादर करण्यात आले . त्याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती प्रमुख चंद्रकांत गाढे , रावेर तालुका अध्यक्ष सुधिर सैंगमिरे , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय बोरसे (धनगर ) , कार्यालीन सचिव बाळु निकम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


