8 दिवसांपूर्वीच तालुक्यातील चितोडा येथील तरूणाचा खून झाला.या प्रकरणी एका महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत.आणि पुढील तपास सुरू आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती..[ads id="ads2"]
यानंतर आज पुन्हा एकदा यावल शहरात महाजन गल्ली आणि काजीपुरा मुख्य रस्त्यावर खुन झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे.
या संदर्भातील प्राथमिक माहितीनुसार,शहरातील परिसरात आज सायंकाळी उशीरा नाजीया जलील काझी (वय ३५,रा.काजीपुरा) या महिलेवर एका पटेल नामक व्यक्तीने कुऱ्हाडीने हल्ला केला.त्यात ती जबर जखमी झाली असता तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्या ठिकाणी ती महिला गतप्राण झाली असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे.शहरात ही खबर वाऱ्यासारखी पसरताच परिसर हादरला आहे.यावल येथील ग्रामीण रूग्णालयात डॉ.पवन जैन यांनी तपासणी करून महिलेस मृत घोषीत केले आहे.यात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.