आपल्या देशात २९ ऑगस्ट हा दिवस हाॅकीचा जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रिडा दिवस साजरा करण्यात येतो. दरवर्षी महाविद्यालया तर्फे राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त विविध क्रिडा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच या वर्षी स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या दिवशी भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे.[ads id="ads2"]
मॅरेथॉन स्पर्धा हे महिला व पुरूष या दोन्ही गटांसाठी असून महिलांना ३ कि.मी. दौड आहे तर पुरुषांसाठी ५ कि.मी. दौड आहे. वयाची अट शिथिल करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नांव नोंदणी चालू आहे. आत्तापर्यंत २४० स्पर्धकांनी नोंदणी केलेली आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडा संचालक डॉ. सचिन झोपे, प्रा. डॉ. आर. व्ही. भोळे, प्रा. डॉ. के. जी. कोल्हे, प्रा. एस.आर. इंगळे, डॉ. जयंत नेहेते, डॉ.एस. एन. वैष्णव, डॉ. पी.आर. गवळी, डॉ. एस.एस. सांळूके, डॉ. व्ही.एन. रामटेके, प्रा. साईनाथ पी. उमरीवाड तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ठिक ८ वाजता सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात होईल तरी आपण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व्हावे आणि आपण जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.