रावेर प्रतिनिधी (विनोद कोळी) प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने फैजपुर विभागाचे उपविभागिय अधिकारी यांना रावेर व यावल तालुक्यातील रस्त्यांच्या दयनिय अवस्थेबाबत प्रहार जनशक्ती शेतकरी आघाडीचे जिल्हा प्रमुख सुरेश चिंधू पाटील यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"]
रावेर (Raver) व यावल (Yawal) तालुक्यातील रस्त्यांची अतिशय दयनिय अवस्था झालेली आहे. यामुळे रस्त्यावरून चालणे वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मोठ मोठी खड्डे पडलेलि असल्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
एखाद्या वेळेस गर्भवती महिलेला दवाखान्यात जाण्यासाठी,खुप अडचणी निर्माण होत आहेत.अशा बर्याच काही समस्या लोकांना झेलाव्या लागत आहेत.याला जाबबदार शासन आहेत.[ads id="ads2"]
याकडे संबधित अधिकारी यांनी त्वरीत लक्ष द्यावे यासाठी प्रांत अधिकारी कार्यालयाला निवेदन देवून येत्या आठ दिवसाच्या आत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख सुरेश चिंधू पाटील यांनी दिला आहे.यावेळी यावल तालुका अध्यक्ष नंदकिशोर सोनवणे, रावेर दिव्यांग तालुका अध्यक्ष विनोद कोळी,प्रहार फैजपुर शहर सोशल मिडिया प्रमुख सचिन कोळी, तसेच यावल व रावेर तालुक्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



