✒️धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगाव : येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे किरण बापुराव सोनवणी यांची अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. [ads id="ads1"]
याबाबत सविस्तर असे की, धरणगाव येथील किरण बापुराव सोनवणी यांचे अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी संघटनेचे कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या प्रमूख पदाधिकारी व अ.भा.क्ष. अहिर शिंपी समाजाचे अध्यक्ष वनेश खैरनार, युवक अध्यक्ष रुपेश बागुल व जळगाव जिल्हाध्यक्ष बंडू शिंपी यांच्या उपस्थितीत संघटनेची बैठक एरंडोल येथे नुकतीच घेण्यात आली. [ads id="ads2"]
याबैठकीत अध्यक्ष खैरनार, बागुल व जिल्हाध्यक्ष शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली व समाज बांधवांनी घेतलेल्या सर्वानुमते मान्यवरांच्या हस्ते किरण सोनवणी यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच यावेळी जिल्हा कार्यकारिणीत गणेश प्रभाकर नेरपगार, सुशांत संतोष सनांसे, युवक कार्यकारिणी महेंद्र छगन मांडगे, राहुल रघुनाथ जगताप आणि तालुकाध्यक्षपदी जितेंद्र रघुनाथ जगताप तालुका सचिव योगेश उमेश मांडगे यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी समाजाप्रती निष्ठावान, कर्तव्यदक्ष व जुने कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.
किरण सोनवणी हे समाज संघटन जोडण्यासाठी तथा संघटनेच्या प्रचार प्रसार करण्यासाठी तत्पर राहतील असा विश्वास संघटनेच्या राज्य कार्यकारिणीतील पदाधिकारी यांनी व्यक्त केला. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांचा हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.



