तुम्हालाही स्वत:चा बिझनेस असावा असं वाटत असेल, तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. सध्या ऑनलाइन शॉपिंगचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. ऑनलाइन वस्तू विकायची झाली, तर पॅकिंगसाठी लागते, कार्टन…! याआधीही पॅकिंगसाठी कार्टनचा (पुठ्ठे) वापर केला जात होता, मात्र प्लास्टिक बंदीनंतर त्याच्या मागणीत खूपच वाढ झाली आहे.[ads id="ads2"]
कार्टन व्यवसायाबाबत…
मोबाईलपासून टीव्हीपर्यंत, चपलांपासून काचेच्या वस्तू असो वा किराणा सामान.. ऑनलाईन शाॅपिंग व्यवसायात या वस्तूंच्या पॅकिंगसाठी पुठ्ठ्याच्या बॉक्सचा वापर करावाच लागतो. प्लॅस्टिकबंदीपासूनच तर पुठ्ठ्याचे बॉक्सला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे कार्टनच्या व्यवसायात नक्की यश मिळू शकते.
सध्या बर्याच कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या वितरणासाठी विशेष प्रकारचे कार्टन बॉक्स वापरतात. कार्टनच्या व्यवसायात प्रवेश करण्याआधी या उत्पादनाबाबत सगळी माहिती असायला हवी. त्यासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग’मधून कोर्स करूनही हा व्यवसाय सुरू करू शकता.
हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
पुठ्ठ्याचे कार्टन्स बनवण्यासाठी प्रामुख्याने क्राफ्ट पेपरचा वापर केला जातो. दर्जेदार कार्टन्स बनवण्यासाठी चांगले ‘क्राफ्ट पेपर’ वापरा. सोबत पिवळा स्ट्रॉ-बोर्ड, गोंद व शिवणाची तार लागेल. सिंगल फेस पेपर कॉरुगेशन मशीन, रील स्टँड लाइट मॉडेलसह बोर्ड कटर, शीट पेस्टिंग मशीन, शीट प्रेसिंग मशीन, इसेन्ट्रिक स्लॉट अशा मशीन घ्याव्या लागतील.
या व्यवसायाला किती खर्च येईल..?
कार्टनच्या व्यवसायासाठी सुमारे 5,500 चौरस फूट जागा लागेल. सेमी ऑटोमॅटिक मशिनच्या साहाय्याने मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर सुमारे 20 लाख रुपये खर्च येईल. पूर्णपणे स्वयंचलित मशीन खरेदी करायचे असेल, सुमारे 50 लाख रुपये गुंतवावे लागतील. ‘मुद्रा’ योजनेंतर्गत तुम्ही सरकारी बँकांकडून सुलभ व्याजदरावर कर्जदेखील मिळवू शकता.
यातून कमाई किती होणार..?
सेटअप पूर्ण झाल्यावर जवळच्या पॅकेजिंग एजन्सीशी संपर्क साधून तुमच्या बॉक्सचे नमुने दाखवा. त्यांच्या ऑर्डरनुसार, तुम्ही कार्टन बनवू शकता.. आगामी काळात पुठ्ठ्याचे कार्टन्सला मागणी वाढणार आहे. तुमच्या उत्पादनासाठी उत्तम पुरवठा साखळी तयार केल्यास, दरमहा 4 ते 6 लाख रुपये सहज कमावू शकता. ग्राहकांची संख्या वाढेल, तशी कमाईत वाढ होत जाईल..