या पकडलेल्या दोन डंपर मालक चालक यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे यावल तहसीलदार ऐवजी प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याकडे असल्याने डंपर चालक-मालक यांच्यात आणि अवैध गौण खनिज वाहतुकीत राजकीय आशीर्वाद असलेल्या काही राजकारण्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रांताधिकारी या डंपर मालक चालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करतील आणि डंपर मालकांकडून अंदाजे आठ ते दहा लाख रुपये महसूल वसूल होणार असल्याचे असल्याचे गौण खनिज वाहन चालकांमध्ये बोलले जात आहे.[ads id="ads2"]
खडक असलेल्या 2 डंपरवर कारवाई करताना बामणोद मंडळ अधिकारी बबीता चौधरी,भालोद मंडळ अधिकारी मिलिंद देवरे,यावल मंडळ अधिकारी शेखर तडवी आणि साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्यासह या चारही मंडळातील तलाठी यांनी संयुक्त पणे कौतुकास्पद कारवाई केल्याने अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली. मंडळ अधिकाऱ्यांनी हे दोन्ही डंपर ताब्यात घेऊन यावल तहसील कार्यालयात जमा केले पुढील कारवाई प्रांताधिकारी कैलास कडलग हे करणार असल्याचे समजले.
अंजाळे शिवारात आर्थिक वर्षात तापी नदी किनारपट्टीवर स्टोन क्रशर मालकांनी आता पर्यंत गौण खनिज किती ब्रास उत्खनन केले ? आणि स्टोन क्रशर मालकांनी प्रत्यक्ष किती ब्रास गौण खनिजाची रॉयल्टी भरली? आणि अंजाळे शिवारातून जळगाव जिल्ह्यात गौण खनिज किती किती ब्रास अवैध अनधिकृत बिना परवानगी वाहतूक करण्यात आली याबाबतची चौकशी करून प्रत्यक्ष पंचनामे केल्यास अवैध गौण खनिजाचे मोठे रॅकेट उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही तसेच शासकीय महसुलात 75 टक्के वाढ झाल्याशिवाय राहणार नाही असे सुद्धा बोलले जात आहे.