आ.चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यास यश : मुक्ताईनगरच्या शासकीय तंत्र निकेतन इमारतीसाठी चार कोटी वीस लाखाचा निधी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


मुक्ताईनगर येथे अल्पसंख्याक समाजासाठी नवीन शासकीय तंत्र निकेतन संस्थेच्या कार्यशाळा व प्रशासकीय इमारतीसाठी आ चंद्रकांत पाटील यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाकडून चार कोटी वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.[ads id="ads1"] 

मुक्ताईनगर येथे सन २०१५ मध्ये अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता नवीन कार्यशाळा व प्रशासकीय संस्था सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता. या इमारतीसाठी शासनाकडून एकूण ५७.५६ कोटीच्या निधीस मंजुरीही देण्यात आली होती.[ads id="ads2"] 

  या इमारतीसाठी आजपर्यंत २९,२०,६००००/- इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला असला तरी इमारतीच्या पूर्णत्वासाठी उर्वरित निधीची आवश्यकता असल्याने तत्कालीन अल्पसंख्याक राज्य मंत्री व सध्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचेकडे आ चंद्रकांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेऊन दि२५ ऑगस्ट २०२२ रोजी परिपत्रक जारी करून मुक्ताईनगर येथील अल्पसंख्याक समाजाच्या शासकीय तंत्रनिकेतन इमारतीसाठी चार कोटी वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि सदरचा निधी शासनाकडून तंत्र शिक्षण संचालनयाला वर्ग देखील केला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!