रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
आजकाल समाज कारण करतांना अनेक व्यक्ती आणि संस्था निदर्शनास येतात पण प्रत्येकाचा काही न काही स्वार्थ असतोच रावेर येथील अंबिका व्यायाम शाळा वेळा अनेक वर्षांपासून निस्वार्थी वृत्तीने काम करीत आहे त्यांचे पदाधिकारी यांचे काम कौतुकास्पद असल्याचे जळगाव येथील प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ उदयसिंग पाटील यांनी भेटी प्रसंगी मनोगत व्यक्त केले.[ads id="ads1"]
अंबिका व्यायाम शाळेच्या गणेश मंडळाने संपूर्ण गणेशोत्सवात विविध अमुपदेशक उपक्रम सादर केले असून रांगोळी स्पर्धे प्रसंगी डॉ उदयसिंग पाटील, सौ योगिनी पाटील, डॉ संदीप पाटील, डॉ सौ योगिता पाटील सेवा निवृत्त सहा वन संरक्षक राजेंद्र राणे, श्री ठोसर सर, श्री कोल्हे सर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, दिलीप वैद्य, परीक्षक सौ क्रांती नाईक, श्रीमती कोल्हे, सौ भारती मुजुमदार आदी मान्यवर उपस्थित होते.[ads id="ads2"]
कार्यक्रम चे प्रस्ताविक पद्माकर महाजन यांनी केले . डॉ संदीप पाटील, सौ भारती मुजुमदार यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले. आभार भास्कर महाजन यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवराज माळी, यशपाल परदेशी, विकास देशमुख , योगेश प्रजापती, ललित चौधरी, शुभांगी महाजन, करुणा महाजन, हर्षाली महाजन यांनी परिश्रम घेतले उपस्थित मान्यवर श्री लखन जी पटेल काका श्री दिलीप पाटील प्रा. श्री ई.जे. महाजन सर श्री रवींद्र महाजन श्री मनोज श्रावक श्री अशोक पाटील श्री चंद्रकांत रायपूरकर श्री आर आर महाजन श्री बाळा आमोदकर योगेश प्रजापती यांनी केले.