या निवेदनाच्या माध्यमातून पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.
1)तेलंगणा राज्यातील जिहादी प्रवृत्तीचे आमदार, पदाधिकारी यांच्याकडून थेट कायदा हातात घेण्याची चिथावणी दिली
जात असतांना तेलंगाणा पोलीस त्यांच्यावर कारवाई करतांना दिसत नाहीत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडवू पहाणाऱ्या संबंधित लोकप्रतिनिधींवर, तसेच त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी. 2) तेलंगाणामध्ये 'तेलंगाणा राष्ट्र समिती चे सरकार असून ते अल्पसंख्यांकधार्जिणे आणि त्यांचे लांगूलचालन करणारे आहे. तेलंगाणा सरकार हे पक्षपातीपणाने वागत आहेत. त्यामुळे राज्यात हिंसाचार करणाऱ्यांना पोलिसांनी सोडून दिल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणखी बिघडू शकते. त्यामुळे केंद्रीय गृह खात्याने यामध्ये लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी.3) टी. राजासिंह यांना तेलंगाणा सरकारकडून न्याय मिळेल,अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यावरील सर्व खटले महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा गोवा या बाजूच्या राज्यांत हस्तांरित करावेत.. 4) टी. राजासिंह यांना ज्या तुरुंगात ठेवले आहे, तेथे आधीपासूनच जिहादी आतंकवाद्यांनादेखील ठेवलेले आहे.या तुरुंगात टी. राजासिंह यांच्या जीवाला धोका आहे. तरी त्यांना सुरक्षित तुरुंगात हलवण्यात यावे.5)टी. राजासिंह यांच्यावर जुन्या प्रकरणाचे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्याचा कुटील डाव रचला जात आहे. त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने केंद्र शासनाने हस्तक्षेप करावा.असे दिलेल्या निवेदनात हिंदू जनजागृती समिती जळगाव जिल्हा प्रमुख प्रशांत हेमंत जुवेकर यांनी म्हटले आहे.