फैजपूर येथील 32 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

फैजपूर येथील 32 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

यावल तालुक्यातील फैजपूर (Faijpur Taluka Yawal) शहरातील जगनाडे नगरातील रहिवासी असलेल्या 32 वर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येतात तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात (Faijpur Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.[ads id="ads1"] 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

फैजपूर शहरातील जगनाडे नगरात (Jangade Nagar,Faijpur) घनश्याम भागवत नेमाडे (32) हा तरुण वास्तव्यास होता व एकटाच असताना व त्याने आपल्या राहत्या घरात मधल्या रूमच्या स्लॅबला लोखंडी आसारीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येतच तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. [ads id="ads2"] 

  त्याचा मृतदेह शवविच्छेदना करीता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये (Yawal Rural Hospital) आणण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात (Faijpur Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक उमेश चौधरी करीत आहेत. तरुणाने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.

हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज

हेही वाचा : - SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1673 जागांसाठी बंपर भरती 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!