तडीपारचे आदेश मोडल्याप्रकरणी रावेर शहरातील 5 जणांविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 09/09/2022 रोजी श्री गणेश मुर्ती विसर्जन मिरवणूका शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडावे या अनुषंगाने खबरदारी म्हणून 63 इसमा विरुध्द रावेर पोलीस स्टेशन कडून मा एस डी एम फैजपूर विभाग यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते.[ads id="ads1"] 

   सदर प्रस्तावातील इसमांना दिनांक 08 /09 /2022 ते दिनांक 10 /09/ 2022 या कालावधीत रावेर तालुका/महसूल येथुन हद्दपार करण्यात आले होते सदर इसमान पैकी इसम नामे

 1)प्रफुल्ल जगदीश महाजन

 2)आकाश लक्ष्मण रील 

3) पंकज नामदेव महाजन 

4) हर्षल अरुण बेलसकर 

5) विनोद विठ्ठल सातव 

सर्व राहणार रावेर [ads id="ads2"] 

 कोणतिही परवानगी न घेता गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आढळून आल्याने सदर इसमान विरूद्ध मा. एस डी एम फैजपूर विभाग यांचे कडिल आदेशाची उल्लंघन केल्याने त्यांच्याविरुद रावेर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले असून अटक करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रावेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी म्हटले आहे.

     

     

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!