Yawal : पंचायत समितीवर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा अधिकाराचा,पदाचा,सत्तेचा 95% प्रभाव.

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील)

पंचायत समितीवर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा आपल्या अधिकाराचा,पदाचा, सत्तेचा 95% प्रभाव असल्याचा प्रत्यक्ष देखावा आज संपूर्ण यावल तालुक्याने बघितला हे यावल पंचायत समिती,जिल्हा परिषद जळगाव आणि सर्व राजकीय पक्षांना संघटनात्मक आणि राजकीय,शासकीय दृष्टिकोनातून आत्मचिंतन करणारे प्रभाव संपन्न कृत्य असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.[ads id="ads1"] 

         सत्तेपुढे कोणाचे शहाणपण चालत नाही,राजा बोले दल हाले, अधिकार,सत्ता,पद असले म्हणजे त्याचा लाभ कसा घ्यावा हे कोणाला सांगण्याची,विचारायची, परवानगीची गरज नाही.याचा प्रत्यक्ष अनुभव आज यावल पंचायत समिती आवारात आणि तेही यावल पंचायत समितीच्या भव्य नवीन इमारतीवरील लागलेल्या मोठ्या बॅनर वरून प्रत्यक्ष अनुभवास आले.[ads id="ads2"] 

        बॅनर वरील मजकूरचे अवलोकन केले असता बॅनरवर मा.संजीवजी निकम यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डी.एन.ई 136 राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छासह शुभेच्छुक म्हणून जळगाव जिल्हा,यावल तालुका ग्रामसेवक संघटना प्रमुख यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांनी आपले स्वतःचे फोटो छायाचित्र असलेले मोठे बॅनर यावल पंचायत समितीच्या इमारतीवर दर्शनी भागावर लावलेले यावल तालुक्यातील व यावल शहरातील नागरिकांनी प्रत्यक्ष बघितले.

       शुभेच्छा फलक यावल पंचायत समितीवर लावला हा फलक लावण्याचा अधिकार ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांचा हक्क आणि कर्तव्य आहे.परंतु यावल पंचायत समितीवर लावलेले हे बॅनर कोणीतरी एक तासाच्या आत काढून घेतल्याने मात्र तालुक्यात व यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

         ग्रामसेवक संघटनेने तसेच यावल तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी हे बॅनर लावताना जिल्हा परिषद जळगाव,मुख्य कार्यकारी अधिकारी आणि यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्यासह यावल नगरपरिषद आणि यावल पोलीस स्टेशन किंवा यावल तहसीलदार यांच्याकडून रीतसर परवानगी घेतली असेलच आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आपले दैनंदिन शासकीय कामकाज करताना ग्रामसेवक,व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून जे सर्वतोपरी सहकार्य मिळत असल्याने आणि ग्रामपंचायत कारभारामध्ये समन्वय साधला जात असल्याने एखाद्या वेळेस बॅनर लावण्याबाबत परवानगी काढली नसेल.आणि परवानगी दिली असेलही, ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी आणि यावल तालुका ग्रामसेवक संघटनेने शुभेच्छा फलकाचे बॅनर एक तासाच्या आत संबंधितांनी काढून का घेतले? याचा खुलासा आता खुद्द यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किंवा सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी करावा आणि त्यांनी तसा खुलासा न केल्यास भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील हे लेखी स्वरुपात मागणी करणार आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!