निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या उपस्थित यावल / रावेर तालुक्यातिल आढावा बैठक दि. २१/०९/२०२२ रोजी घेण्यात आली तसेच संघटनेचे पदाधिकार्यांवर काय जबाबदारी असते पदाधिकार्यांनी नेता म्हणून नाही तर स्वतःला कार्यकर्ता समजून संघटनेचे कार्य केले पाहिजे .[ads id="ads1"]
विधवा , घटस्फोटीत , परित्कता पुनर्विवाह संघटनेने आयोजित केलेला आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी हा मॅसेज समाजात पोहचवण्यासाठी संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष यांनी सांगितले तसेच दि .२४/०९/२०२२ पासून रावेर / यावल / मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये जनसंपर्क अभियानास सुरुवात करण्यात येणार आहे.
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
तसेच तालुक्याचे पदाधिकारी व शाखा अध्यक्ष यांनी ग्रामीण भागात फुले - शाहू - आंबेडकरी विचारधारा प्रत्येक घरा - घरात पोहचवली पाहिजे अश्या सुचना संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष यांनी दिल्या त्याचप्रकारे अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.[ads id="ads2"]
त्याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती प्रमुख चंद्रकांत गाढे , महिला मंच जिल्हा प्रमुख नंदाताई बाविस्कर , जिल्हा नियोजन समिती महासचिव सदाशिव निकम , जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , फैजपुर विभाग प्रमुख भगवान आढाळे , यावल तालुका अध्यक्ष विलास भास्कर , यावल तालुका युवक अध्यक्ष विलास तायडे , यावल तालुका महिला मंच अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे , रावेर तालुका अध्यक्ष सुधिर सैंगमीरे , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय बोरसे ( धनगर ) , इकबाल तडवी , चंद्रकांत सोनवणे ( कोळी ) , शरद बगाडे , ज्योतीताई कुरकुरे , दिपक मेढे , नितिन मेढे , सिकाऱ्या पावरा , संजू तायडे , मांगीलाल भिलाला , शे . नजमउद्दीन , सुनिल बारेला तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .