पोलीसानकडून पत्रकारास धमकी दिल्याने पत्रकारांच्या वतीने 'त्या' पोलीसाचा निषेध : डिवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे यांना दिले निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील मालोद व परसाडे येथील ग्रामपंचायतच्या पार पडलेल्या सार्वत्रीक निवडणुकीची मतमोजणी 1 दिवसापूर्वी येथील तहसील कार्यालयात सुरू असताना वृत्तांकन करण्यासाठी यावल येथील पत्रकार शेखर पटेल यांनी तहसीलदार महेश पवार यांचे परवानगीने तसेच पोलीस निरीक्षकांनीही परवानगी दिल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यांने,[ads id="ads1"] खरोखरच साहेबांनी परवानगी दिली आहे का? जर दिली नसेल तर तुम्हाला महाग पडेल अशी धमकी दिल्याने यावल तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने निवेदन फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे,प्रांताधिकारी कैलास कडलक तसेच येथील पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना दिले.[ads id="ads2"] 

   तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांचे परवानगी नंतरही यावल येथील एका पोलिसांने पत्रकारास दिलेल्या धमकीबद्दल तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असुन.या संदर्भातील निवेदन देताना पत्रकार संघ शहराध्यक्ष सुरेश पाटील,अय्युब पटेल,डी.बी.पाटील,शेखर पटेल, प्रकाश चौधरी,सुनिल गावडे , तेजस यावलकर,पराग सराफ, विकी वानखडे,दीपक नेवे, समाधान पाटील,फिरोज तडवी, ज्ञानेश्र्वर मराठे,वासूदेव सरोदे,योगेश सोनवणे,समीर तडवी,निलेश पाटील यांचे सह पत्रकार बांधव याप्रसंगी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!