प्रसंगी तालुक्याच्या गटविकास अधिकारी श्रीमती दिपाली कोतवाल मॅडम, गटशिक्षणाधिकारी श्री. शैलेश दखणे सर, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रत्न लोहार मॅडम, श्री विलास कोळी सर, मायक्रो विजन एकेडमी स्कूलचे प्राचार्य श्री.दिपक महाजन सर, परीक्षक म्हणून परीक्षक प्रा. डॉ. अविनाश सोनार,प्रा. डॉ. एस. जी. चिंचोरे, व्ही एस नाईक वरिष्ठ महाविद्यालय रावेर प्रा. डॉ. डी बी पाटील, सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालय ऐनपुर श्री.संदिप डिगंबर पाटील - जिल्हा समन्वयक, श्री.एस.आर. महाजन - तालुका समन्वयक,श्री.डी.आर. साळवे - तालुका सहसमन्वयक सर्व सन्माननीय केंद्रप्रमुख मंचकावर उपस्थित होते.[ads id="ads2"]
सर्वप्रथम मंचावरील माननीय पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेचे व भारताचे माजी राष्ट्रपती थोर वैज्ञानिक श्री.ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले नंतर आदरणीय आमदार माननीय श्री. शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. बालवैज्ञानिकांच्या प्रत्येक मॉडेल ला भेट देऊन आदरणीय आमदार साहेबांनी मॉडेलची माहिती बालवैज्ञानिकांकडून जाणून घेतली प्रसंगी इतर अतिथिनी सुद्धा प्रदर्शनीला भेट देऊन त्यांच्या विज्ञान विषयक संकल्पना समजून घेतल्या व त्यांना प्रोत्साहित केले परीक्षकांनी सुद्धा स्पर्धेचे सूक्ष्म व पारदर्शक परीक्षण करून निकाल तयार करण्यात आला. दुपारी ४ वाजता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला तालुक्याच्या सन्माननीय गटविकास अधिकारी श्रीमती दिपाली कोतवाल मॅडम, तसेच माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब श्री. जे.के. पाटील सर, गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे सर, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रत्ना लोहार मॅडम, व श्री विलास कोळी सर व सर्व सन्माननीय केंद्रप्रमुख हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या प्रदर्शनीच्या यशस्वी साठी मायक्रोविजन अकॅडमीचे आदरणीय श्रीराम पाटील साहेब,व्यवस्थापक श्री स्वप्निल पाटील साहेब प्रशासक श्री दुबे सर प्राचार्य व सर्व मायक्रो विजन अकादमीच्या कर्मचाऱ्यांनी प्रदर्शनाची व्यवस्था बीआरसी स्टॉप च्या मदतीने अत्यंत चोखपणे करण्यात आली होती सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निलेश पाटील सर व श्री कैलास घोलाने सर यांनी केले आभार प्रदर्शन श्री. गणेश धांडे सर केंद्रप्रमुख यांनी मानले.



