यावल (सुरेश पाटील) तालुक्यातील अनेक गावांमध्ये अनु जाती / जमातीचे तसेच इतर गोरगरिब मोठया प्रमाणात वास्तव्यास असुन ते आजही त्यांच्या मुलभुत हक्कापासून वंचित आहेत तसेच काही लोक जाणिव पुर्वक त्यांच्यावर अन्याय करित आहेत त्यात काही ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, स्वस्त धान्य दुकानदार, शिक्षक, ठेकेदार असे अनेकांचा समावेश आहे.[ads id="ads1"]
तरी आपण या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करून खालील नमुद असलेल्या गावनिव्हाय गांवातिल समस्यांचे निराकरण करून त्यांना त्यांचा मुलभुत अधिकार व त्यांचे हक्क मिळवून दयावे अशी मागणी निळे निशान सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी गटविकास अधिकारी यांचेकडे केली आहे. समस्याग्रस्त गाव व त्यातील समस्या[ads id="ads2"]
(१) मारुळ ग्रामपंचायत हद्दीतिल चारमळी गाव येथे पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करावी, तसेच चारमळी गावात विजचे खांब टाकून विज जोडणी करण्यात यावी, गावांतर्गत रस्ते करण्यात यावे. बालकांकरिता अंगणवाडी करण्यात यावी., जि. प. शाळेतील शिक्षकांने शासनाची दिशाभूल केली असून त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी, प्राथमिक आरोग्य केंद्र करण्यात यावे, तसेच अंगवाडी सेविकेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, आदिवासी समाजाला स्वस्त धान्यापासून वंचित ठेवणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी.
२) भालशिव ग्रामपंचायतिने दलितवस्तीचा निधी सन २००० ते २०२२ याकालावधीत कुठे, कसा व किती खर्च केला याची चौकशी करावी, टेंभी कुरन सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेत मंजुर झालेल्या रस्त्याच्या कामात दिरंगाई करण्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, टेंभी कुरुन येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था करावी, टेंभी कुरुन मतदारांचे नाव भालशिव ग्रामपंचायतिच्या मतदार यादि नाव समाविष्ट करण्यात यावे.३) धुळेपाडा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, गावा अंतर्गत रस्ते करण्यात यावे, जि. प. शाळेची इमारत करण्यात यावी, स्वस्त धान्य मिळावे.
४) सांगवी बु ॥ येथील भिल्ल समाजाकरिता तात्काळ दफनभूमीची जागा मिळणे, स्वस्त धान्य मिळणे, सन २०११ च्या शासन निर्णयाप्रमाणे भिल्ल समाज रहात असलेल्या घरांची नमुना नं. ८ ला नोंद होणे. ५) अट्रावल येथिल भिल्ल समाज रहात असलेल्या घराची नमुना नं. ८ ला नोंद करण्यात यावी, स्वस्त धान्य मिळावे.
६) चितोडा गावातिल बेघर भुमिहिन यांना घरकुलाचा लाभ का देण्यात आला नाही, तसेच चितोडा ग्रामपंचायतने आतापर्यंत अपंगांचा पाच टक्के निधी किती वेळेस वितरित केला याची चौकशी करण्यात यावी.
यावल तालुक्यातिल चारमळी, धुळेपाड, टेंभी कुरन, सांगवी ॥ अट्रावल, चितोडा या गावांमध्ये सन २००० ते २०२२ या कालखंडात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत किती लाभार्थींना वैयक्तीक शौचालयाचा लाभ देण्यात आला तसेच घरकुल योजनेचा किती लाभार्थींना लाभ देण्यात आला याची माहिती मिळावी व तात्काळ चौकशी करण्यात यावी.अनु. जाती / जमातीच्यां लोकांनवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असून वरिल नमुद केलेल्या विषयांच्या संदर्भात दि. १५/०९/२०२२ पर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर मिळणे अपेक्षीत आहे अन्यथा दि. १६ सप्टेंबर २०२२ रोजी संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालय यावल येथे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
त्याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती प्रमुख चंद्रकांत गाढे, जिल्हा नियोजन समिती महासचिव सदाशिव निकम, जेष्ठ कार्यकर्त्या नंदाताई बाविस्कर जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे, यावल तालुका अध्यक्ष विलास भास्कर, यावल तालुका युवक अध्यक्ष विलास तायडे, यावल तालुका महिला मंच अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे, यावल तालुका महिला मंच उपाध्यक्षा ज्योतिताई कुरकुरे, तालुका उपाध्यक्ष सय्यद सखावत, तालुका सल्लागार राहुल तायडे, मिलिंद सोनवणे, मांगिलाल भिलाला, सिकारा पावरा, पिंटु भिल, सुपडु भिल व ईतर शेकडो महिला पुरुष उपस्थित होते सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागिय अधिकारी (प्रांत) तहसिलदार यांना दिलेल्या आहेत.


