शाळेतील व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष व मुख्यध्यापक यांनी अनेक वेळा त्या बाबत माहिती दिली परंतु ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच या कडे दुर्लक्ष करीत आहे अंगणवाडी च्या व शाळेच्या वाट्यावर मूल जेवायला बसतात आणि त्या ठिकाणी काही लोक सतत घाण करीत असतात त्या मुळे अंगणवाडी तील बालकांच्या आरोग्याला व मराठी शाळेतील मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या बाबत पालक वर्ग चिंतेत पडलेला आहे.[ads id="ads2"]
गरीब मजूर वर्गातील लोकांचे मूल जि प शाळेत शिक्षण घेत आहे म्हणून ग्रामपंचायत या शाळे कडे लक्ष देत नाही का? असा प्रश्न पालकांना पडलेला आहे मूल हि देवाघरची फुल आहे परंतु या देवाघरच्या फुलांचे च आरोग्य धोक्यात आले आहे त्या कडे कधी सरपंच उपासरपंच सत्ता धारी लक्ष देतील का ? गावातील घाणेरड्या राजकारणामुळे मराठी शाळा च टार्गेट झालेली आहे आणि त्या घाणेरड्या स्वार्थी राजकारणामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे व शाळेचे मोठे नुकसान होत आहे.
ज्या ठिकाणी मूल शिक्षण घेतात खाऊ खातात त्या ठिकाणी लोक संडास व घाण करीत असतील बिड्या गांजा जुगार खेळत असतील तर या वरूनच त्या शाळेची अवस्था कशी असेल हे लक्षात येते या घाण करणाऱ्या व जुगार करणाऱ्या लोकांचा काहीतरी बंदोबस्त करण्यात यावा असे पालकांचे म्हणणे आहे. गावातील मुलांचे ज्या ठिकाणी भविष्य घडत असते अश्या पवित्र ज्ञाना च्या ठिकाणी तरी स्वार्थी पोटभरू लोकांनी राजकारण करू नये अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केलेली आहे.


