दि .२ सप्टेंबर २०२२ रोजी चोपडा शहरात अनेक वर्ष देशाचे रक्षण करून स्वगृही परतलेल्या सेवानिवृत्त माजी सैनिक आदरणीय पंकजजी पाटील यांना किरकोळ अशा कारणामुळे चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अवतारसिंग चौव्हाण यांनी अमानुषपणे मारहाण केलेली असून आपले पद व अधिकाराचा दुरपोयोग केलेला आहे तरी घडलेली घटना अतिशय निंदनिय असून मानुसकीला काळीमा फासणारी आहे.[ads id="ads1"]
त्यामुळे आम्ही घडलेल्या घटनेचा निषेध करतो तसेच पोलिस प्रशासनाची प्रतिमा मळीन करणाऱ्या चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अवतारसिंग चौव्हाण याना पोलीस सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे . अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलनात्मक भुमिका घेण्यात येईल याची नोंद घ्यावी.[ads id="ads2"]
त्याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती प्रमुख चंद्रकांत गाढे , जिल्हा नियोजन समिती महासचिव सदाशिव निकम , जेष्ठ कार्यकर्त्या नंदाताई बाविस्कर , जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , यावल तालुका अध्यक्ष विलास भास्कर , यावल तालुका युवक अध्यक्ष विलास तायडे , यावल तालुका महिला मंच अध्यक्षा लक्ष्मीताई मेढे , महिला मंच उपाध्यक्षा ज्योती कुरकुरे , ता . उपाध्यक्ष सय्यद सखावत , ता . सल्लागार राहुल तायडे , मिंलिद सोनवणे , मांगिलाल भिलाला ' सिकारा पावरा , पिंटु भिल , सुपडु भिल व ईतर शेकडो महिला पुरुष उपस्थित होते.


