रावेर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने दिवाणी व फौजदारी न्यायालयात मानसिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मार्गदर्शन शिबीर संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)

मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय,मुंबई च्या दिनदर्शिका अन्वये तसेच मा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांचे मार्गदर्शना नुसार आज दि. 12 सप्टेंबर सोमवार रोजी तालुका विधी सेवा समिती,रावेर च्या वतीने दिवाणी व फौजदारी न्यायालय,रावेर येथे NALSA(Legal Service to the Mentally ill and Mentally Disabled Person), Siemens, 2015 मानसिक दृष्ट्या दुर्बल घटकांना NALSA कडून पुरवल्या जाणार्‍या सेवा या विषया वर दिवाणी व फौजदारी न्यायालय,रावेर येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. [ads id="ads1"] 

  शिबिराचे अध्यक्षस्थानी मा.न्या.श्री.प्रविण पी. यादव साहेब,अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती,रावेर तथा दिवाणी न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालय,रावेर असून साहेबांनी मानसिक दृष्ट्या दुर्बल घटकांना विधीसेवाप्राधिकरणा मार्फत पुरविल्या जाणार्‍या सेवा तसेच Mental Helth Act 1987 यावर मार्गदर्शन केले.[ads id="ads2"] 

  प्रमुख वक्ते डॉ.श्री.योगेश राणे,ग्रामीण रुग्णालय,रावेर यांनी Mentally ill व Mentally Disabled Person यांमधील फरक समजाऊन त्यावर सविस्तर माहिती सांगितली, सूत्र संचालन श्री.दिपक तायडे, प्रास्ताविक अँड.श्री.रमाकांत महाजन, आभार अँड श्री.जगदीश महाजन यांनी केले. तसेच कार्यक्रमाला तालुका विधी सेवा समिती चे समांतर विधी सहाय्यक श्री.राजेंद्र अटकाळे, श्री.बालकृष्ण पाटील, श्री.दयाराम मानणारे गुरुजी तसेच सहकारी यांनी सहकार्य केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!