रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर तालुक्यातील निंभोरासिम येथील रहिवासी राजु भागवत सवर्णे यांची नुकतीच अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.[ads id="ads1"]
अनुसूचित जाती कमेटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठिया यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व युवानेते खा. राहुल गांधी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांच्या शिफारशी वरून सदरची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली[ads id="ads2"] असून त्यामधे जळगाव जिल्ह्यातुन राजु सवर्णे यांची महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली .सदर निवडी बद्दल त्यांचे जिल्हा भरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.