यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या आदेशानुसार लंपी स्किन लस् उपलब्ध करून दिल्या. पशुवैद्यकीय दवाखान्यात मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा जाणवत आहे.पशुपालकांना महागडी औषधे बाजारातून विकत घ्यावी लागत आहे. [ads id="ads2"]
शेतकरी केळीवर सी एम व्ही रोगाने ग्रस्त असून अशात गुरांवर लंपि स्किन आजार आल्याने पशुपालक व शेतकरी हतबल झाला आहे .यासाठी शासनाने त्वरित दखल घेऊन औषधे उपलब्ध करून द्यावी .पशुपालकांना गोठा स्वच्छ करण्याचे औषधे पशुवैद्यकीय दवाखान्यातून दिले जात आहे. गोठ्यातील लंपी आजारग्रस्त गुरांवर वेळीच उपचार मिळाल्याने जनावरांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे पशुपालक वसिम बेग रशीद बेग यांनी यावेळी बोलून दाखवले. अंतुरली गावासाठी जनगणने पशुंच्या जनगणनेनुसार 1498 लसीचे उद्दिष्ट 80 टक्के पूर्ण केल्याच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर मेघा अंबलकर यांनी सांगितले पशुपालकांनी गुरांवर लक्षणे आढळल्यास त्वरित पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून घ्यावे. त्याचप्रमाणे लसीकरण गुरांवर घरोघरी गावोगावी जाऊन करण्यात आले असे सांगण्यात आले .लोकप्रतिनिधींनी लंपि आजारावर त्वरित पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधे उपलब्ध होतील यासाठी शासनाकडे प्रयत्न करून पशुपालकांना दिलासा द्यावा अशी मागणी अनिल वाडीले शे. भैय्या शे. करीम ,प्रकाश कोळी व पशुपालकांनी केली आहे. यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर मेघा अंबलकार, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. चंद्रकांत हलगे, नामदेव बेलदार, ज्ञानेश़वर भगत उपचार करिता आहे.