🔹धरणगाव शहरातील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील पंढरीनाथ चौधरी यांनी सिध्दीचा केला सन्मान !.....
धरणगाव प्रतिनिधी - पी.डी.पाटील सर
धरणगांव - धरणगाव शहरातील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील पंढरीनाथ चौधरी यांनी सिध्दीचा सन्मान केला.[ads id="ads1"]
आईला घर कामात मदत करत अभ्यासात रममाण असणाऱ्या सिद्धीने सुरुवातीपासून अभ्यासात आपली चांगलीच चुणूक दाखवली 10वी आणि 12वीत देखील पहिला क्रमांक मिळवत अमळनेर शहरातील सेंट मेरी विद्यालयात शिकणाऱ्या सिद्धीने ध्येय विचलित न होऊ देता वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' मध्ये देखील घवघवीत यश संपादन केले आहे. तिला 609 गुण मिळाले आहेत.
सिद्धीचे आई आणि वडील हे दोन्ही देखील शिक्षक असल्यामुळे आधीपासूनच घरात शिक्षणाबद्दल महत्वहोते...त्याचाच परिणाम म्हणून सिद्धी अभ्यासात सातत्य ठेऊ शकली मुलीच्या या यशामुळे सगळे कुटुंबीय आनंदित झाले असून आपल्या मेहनतीला फळ आल्याचे तिच्या आई वडिलांनी सांगितले.[ads id="ads2"]
हीच बातमी वृत्तपत्रात वाचल्यानंतर धरणगाव शहरातील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील पंढरीनाथ चौधरी यांनी सिद्धीच्या वडिलांशी संपर्क साधत सिद्धीच्या या यशाचं कौतुक केलंय आणि तिच्या मेहनतीला शाबासकीची थाप देत मनोबल वाढवण्यासाठी थेट अमळनेर येथे निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले आहे. यावेळी डॉक्टर कोमल महाजन, डॉक्टर सुभाष महाजन, रितेश सोनवणे, फारुख पिंजारी, आणि वडील हिंमत चौधरी, आई उपस्थित होते. युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा आणि लेखणी बळकट व्हावी याकरिता पेन देत या सर्वांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
हेही वाचा :- स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे "या" विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांची शिष्यवृत्ती
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- अटल पेंशन योजनेतंर्गत मिळणार 5000 हजार रुपये महिना
यावेळी मनोगतात सुनील चौधरी म्हणाले तालुक्याची, राज्याची आणि देशाची सिद्धीच्या हातून सेवा घडो. त्याचबरोबर सिद्धी देखील व्यक्त झाली हे सर्वस्वी यश आई वडील आणि माझ्या गुरुजनांचे आहे..