रावेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे महागाई विरोधात तीव्र निदर्शने

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 केंद्र सरकारच्या धोरणांमुळे वाढणाऱ्या महागाईवर अंकुश लावणे तथा राज्यसरकारच्या गलथान कारभाराविरुद्ध रावेर तालुका राष्ट्रवादि युवक काँग्रेस पार्टी तर्फे आज रावेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी युवक जिल्हाकार्यध्यक्ष दिपक पाटील,युवक तालुकाध्यक्ष सचीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली.[ads id="ads1"] 

सध्या देशात चालू असलेल्या कारभारामुळे महागाई आवाक्याच्या बाहेर जात आहे GST चे कोणतेही तर्क नाहीत गरिबांची बचत,खाद्य पदार्थ यावरही GST आकारला जात आहे.एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात नव्याने आलेले दळभद्री राज्यसरकारच्या भोंगळ कारभार करीत आहे.अती वृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.ओल्या दुष्काळाची मागणी असतांना हेतुपुरस्कर ओला दुष्काळ जाहीर करत नाहीत.महाविकास आघाडीने घेतलेले लोकाभिमुख निर्णय रद्द करत आहेत.[ads id="ads2"] 

  यासाठी केंद्र व महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी '50 खोके महागाई एकदम ok", जनता भरते GST, गद्दार आमदार फिरतात गोवाहाटी अश्या घोषणा देत अंदोलन केले यावेळी माजी जी.प.सदस्य रमेश पाटील,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी,शहरअध्यक्ष मेहमूद शेख,प.स.सदस्य योगेश पाटील,जिल्हाउपाध्यक्ष कुणाल महाले,जिल्हाप्रवक्ते वाय.आर पाटील,महिला तालुकाध्यक्ष रेखाताई चौधरी,माजी प.स.सदस्य योगिताताई वानखेडे,निभोरा सरपंच सचिन महाले,किशोर पाटील,सामाजिक न्याय जिल्हाकार्यध्यक्ष पंकज वाघ,जिल्हासरचिटणीस मायाताई बारी,अजंदा ग्रा.प.सदस्य पांडुरंग पाटील,ऐनपूर सरपंच अमोल महाजन,सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष जगदीश कोचुरे,निंभोरासीम माजी सरपंच गणेश चौधरी भुसावळ येथील अमोल चव्हाण,गोपाळ पाटील,रवींद्र पाटील,कांडवेल उपसरपंच किशोर कचरे,जीवन बोरनारे,चेतन पाटील,अरविंद महाजन,हैदर शेख रनगांव उपसरपंच नितीन पाटील,पाडले खु.सरपंच गजानन चौधरी,तासखेडा ग्रा.प सदस्य चेतन पाटील केऱ्हाळे खु.ग्रा.प.सदस्य सतीश निकम,उपसरपंच फकिरा तडवी,ग्रा.प.सदस्य महेंद्र पाटील,पाडले बु.उपसरपंच रशीद तडवी,विवरे ग्रा.प.सदस्य दिपक हिवरे,अविनाश पाटील,राहुल महाजन,अक्षय सोनवणे,गणेश देवगिरीकर,निखिल महाजन,भूषण कोळी,तेजस पाटील,रोहन चऱ्हाटे,अमित पाटील,शुभम मुर्हेकर,आशुतोष पाटील,भूषण महाजन,हर्षल पाटील भूषण पाटील,ग्रा.प.सदस्य विनोद चौधरी,प्रशांत पाटील,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!