गायीसोबत अनैसर्गिक संभोग ; एकास पोलिसांनी केली अटक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 कलियुगात मानसिकता दिवसेंदिवस नीच पातळीवर पोहचत चालली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अनेक गोष्टी दररोज समोर येत असतात पण त्यातच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे विकृततेचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे.एका नराधमाने गायीसोबत अनैसर्गिक संभोग केला असून याप्रकरणी अमळनेर पोलिसात (Amalner Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेल्या घटनेमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असून संताप व्यक्त होत आहे.[ads id="ads1"] 

आतापर्यंत आपण अनेक विचित्र घटना वाचल्या तथा ऐकल्या असेल. परंतु, एक अत्यंत माणुसकीला काळिमा फासणारी आणि लाजिरवाणी व शर्मसार करणारी ही घटना समोर आली असून एका इसमाने गायीसोबत अनैसर्गिक संभोग केला आहे. ही घटना अमळनेर तालुक्यात दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, काही हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याने त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली असून संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.[ads id="ads2"] 

शकील सांडखे मेवाती रा.सावबेटा अमळनेर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत गणेश सुरेश साळुंखे (वय ३५, रा.भिलाली ता.पारोळा, जळगाव) यांनी पारोळा पोलिसांत फिर्याद दाखल केली. संशयित आरोपी शकील सांडखे मेवाती याने दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास फिर्याद गणेश सुरेश साळुंखे यांच्या घराजवळच्या गोठ्यात बांधलेली गाई जातीच्या कालवाडी सोबत अनैसर्गिक संभोग केला.

या प्रकरणी फिर्यादी गणेश सुरेश साळुंखे यांनी पारोळा पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनास्थळी एसडीपीओ, अमळनेर राजेश जाधव यांनी भेट दिली. त्यानुसार संशयित आरोपी शकील सांडखे मेवाती रा.सावबेटा अमळनेर यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्व पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेखरे डोमाळे करत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!