जळगाव (विनोद कोळी) आदिवासी कोळी महासंघ अध्यक्ष,दशरथजी भांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबई आझाद मैदान येथे 15 सप्टेंबर 2022 पासून बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू आहे. याठिकाणी महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांनी भेट दिली व उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या.[ads id="ads1"]
प्रमुख मागण्या
1. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सरसकट देण्यात यावे.
2. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 6 जुलै 2017 रोजी बहिरा केस संदर्भात दिलेल्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून आदिवासी विभाग व सामान्य प्रशासन विभागाने षडयंत्र करून हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून 21/12/2019 रोजी काढलेल्या अधिसंख्या पदाचा शासन निर्णय तत्काळ रद्द करून कर्मचाऱ्यांना पूर्ववत करण्यात यावे.[ads id="ads2"]
3. माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांची दिनांक 7/12 /21 रोजी अधिसंख्या सेवानिवृत्त कर्मचारी यांना तात्पुरते पेन्शन देणे बाबत आदेश देऊनही संबंधित प्रशासन या निर्णयाची अंमलबजावणी न करता पेन्शन देण्यात टाळाटाळ करत आहे तरी माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून त्या सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ पेन्शन, ग्रॅज्युएटी व इतर सर्व लाभ देण्याची कारवाई सुरू करावी.
या मागण्यांचे निवेदन यावेळी कोळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रीमहोदयांना दिले.त्याठिकाणी उपस्थीत,कोळी समाजाचे माजी कबिनेट मंत्री,दशरथजी भांडे साहेब,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष,प्रल्हाद सोनवणे,नितीन भाऊ कांडेलकर,कैलास सोनवणे. जलगाव तसेच,प्रशांत तराळे,महिला जिल्हा अध्यक्ष,सुनीता ताई कोळी, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष संजय कांडेलकर.महिला रावेर तालुका अध्यक्ष,सविता ताई कोळी तसेच बरेच पदाधिकारी तेथे मोठ्या प्रमाणावर उपस्थीत होते.


