सन २०२१-२०२२ हे आर्थिक वर्ष संपून सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही रावेर तालुक्यातील विवरे खुर्द ग्रा प सह तब्बल २६ ग्रा प ची लेखे इ- ग्रामस्वराज्य या संकेत स्थळावर तालुका गट समनवयक श्रीमती घुलाने आणि त्यांच्या आधिनस्त संगणक परिचालक यांनी अपलोड न केल्याने गेल्या दोन वर्षापासूनचा १५ वा वित्त आयोगाचा निधी रावेर तालुक्यातील एकूण ३६ ग्रा प ना खर्चच करता आलेला नाही.[ads id="ads2"]
सीईओ यांच्या बैठकीत काही ग्रामसेवक यांनी ही बाब निदर्शनासही आणून दिली ; मात्र तीन दिवस उलटूनही पंचायत समिती चे या समस्येकडे लक्ष गेलेले नाही तसेच या आढावा सभेत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ची कामे वेळेवर व मुदतीत पूर्ण न करणाऱ्या रसलपूर व कोचुर बु येथील ग्रामसेवकाची चौकशी करून त्यास निलंबित करण्याचे आदेश सी इ ओ यांनी दिल्याचे समजते.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी नेमका कोणत्या कामाचा आढावा घेऊन पंचायत समितीच्या कामकाजाचे कौतुक केले, हा प्रश्न रावेर तालुका वासीयांना आता पडला आहे.


