शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कर्णबधिर तपासणी करिता बेरा मशीन उपलब्ध ; प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या पाठपुराव्यास यश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जळगाव (विनोद कोळी) आज दिनांक १५/०९/२०२२ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी कान नाक घसा या विभागा साठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नेहमीच्या पाट पुराव्याने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेला यश आले.[ads id="ads1"] 

   सविस्तर वृत्त असे कि माघील ४महिन्या पासून प्रहार अपंग क्रांती संघटना यांनी जे कर्णबधिर व्यक्तींना मुंबई आल्यावरजंग येथील तपासणी साठी वारंवार जावे लागत होते हे लक्षात घेता माननीय वैद्यकीय अधिष्ठाता श्री रामानंद सर उपाधिष्ठाता श्री मारुतीराव पोटे तसेच त्यांचे सहाय्यक कर्मचारी यांनी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या मागणीची वेळेत दखल घेऊन कर्णबधिर तपासणी करिता बेरा मशीन आपल्या जळगाव जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सुरुवात करण्यात आली असून आज रोजी दिनांक१५/०९/२०२२ रोजी तीन दिव्यांग बांधवांची तपासणी करून उद्घाटन करण्यात आले.[ads id="ads2"] 

 यावेळी जळगाव शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता माननीय श्री रामानंद सर दिव्यांग बोर्डाचे अध्यक्ष व उपाधिष्ठाता श्री मारुतीराव पोटे सर कान नाक घसा या विभागाचे असोसिएट प्रोफेसर श्री सरोदे सर जिल्हा रुग्णालय अधीक्षक गायकवाड सर प्रहार दिवंगत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब पाटील उपजिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र जाधव चाळीसगाव तालुका अध्यक्ष निळकंठ साबणे चाळीसगाव महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ स्वातीताई कुमावत महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष मनीषा ताई पाटील पाचोरा तालुका अध्यक्ष महेश गोंड जळगाव जिल्हा सचिव श्री धर्मराज पाटील सत्यजित पाटील किशोर पाटील प्रहार सेवक श्री गणेश दादा महाले विश्वासराव पगारे गणेश पाटील आदींनी उपस्थिती देऊन शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब पाटील यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता श्री रामानंद सर तसेच उपाधिष्ठ आता श्री मारुतीराव पोटे यांचे आभार मानून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!