प्रहार दिव्यांग संघटने तर्फे विविध विषयांवर रावेर तहसीलदार/गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  



रावेर प्रतिनिधी (विनोद कोळी) प्रहार संघटनेचे माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ यांच्या विचार सारणी लक्षात घेता,आज दिनांक 05/9/2022 ला उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्याअध्यक्षतेखाली तसेच दिव्यांग जिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रहार दिव्यांग तालुका अध्यक्ष विनोद कोळी यांच्या तर्फे तहसीलदार संजय तायडे. तसेच गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांना दिव्यांग बांधव तसेच विधवा महिला यांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"] 
मागण्या खालील प्रमाणे 

1) रावेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मधिल ग्रामसेवकांनी.सन 2016च्या GR नुसार 2016 ते 2018 दरम्यान 3% निधी तसेच 2018ते 2022/23 या कालावधी पर्यंतच्या ग्रामपंचायतच्या स्वउत्पन्न ग्रामपंचायत निधीतून दिव्यांग बांधवांना 5% निधी त्वरीत देण्यात यावा.

2) तसेच दिव्यांग बांधवांना 50% घरपट्टी मधे माफ करण्यात यावे.

3) दिव्यांग बांधवांना बस,रेल्वेच्या 75% सवलती साठी जिल्हा स्तरावर हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात.म्हणून तालुक्यातील प्रत्येक,ग्रामपंचायती मधे शासनाने स्वतंत्र पोर्टल(वेबसाईट) देण्यात यावे.

4) दिव्यांग बांधव तसेच विधवा महिलांना 2013 च्या GR नुसार अंत्योदय कार्डचा लाभ एक मही-ण्याच्या आत त्वरित देण्यात यावा.[ads id="ads2"] 

 वरील मागण्या 1 महिन्याचा आत पुर्ण न झाल्यास प्रहार अपंग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेने यावेळी दिलाआहे.यावेळी प्रहार संघटनेचे शेतकरी जिल्हा प्रमूख सुरेश चिंधू पाटील.प्रहार दिव्यांग तालुका अध्यक्ष,विनोद कोळी,उपाध्यक्ष जितेंद्र कोळी,शाखा उपाध्यक्ष,सुरेश अवसरमल,प्रहार अल्पसंख्यांक सोशल मिडिया प्रमुख,फिरोज तडवि.शाखा स-दस्य,विश्वनाथ भिल्ल,प्रहार ऑफिस प्रमुख,सुधिर पाटील.तसेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते,गजानन कोळी,आनंदा कोळी सुलवाडि,प्रशांत तायडे,निंबोल इत्यादी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!